फेरमतदान झालंच पाहिजे, पुणेकर ठाम !

April 18, 2014 11:21 PM1 commentViews: 2327

pune_voter_scam18 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात पुण्यात मतदान यंत्र आणि मतदार यादीत घोळ समोर आला. त्यामुळे लाखो पुणेकरांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. यामुळे संतापलेल्या पुणेकरांनी आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर तक्रारींचा पाऊस पाडला. दुसरीकडे मतदार यादीतल्या घोळाची निवडणूक आयोगानं दखल घेतल्यानंतर भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. पण याप्रकरणी पुणेकर नागरिक जनहित याचिका दाखल करणार आहेत.

मतदार यादीतल्या घोळाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाने पुणेकर नागरिकांना सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत अर्ज देण्यासाठी सांगितलं होतं. पण नागरिकांच्या आग्रहानुसार दिवसभर हे अर्ज स्विकारण्यात आले. एक हजार पुणेकर मतदारांनी हे अर्ज दिले.

तर दुसरीकडे विरोधकांनी फेरमतदानाची मागणी केली. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही, यावर मीडियामधून वारंवार टीका झाल्यानंतर मग काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. पण फेरमतदानाच्या मुद्यावर त्यांनी चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलवलाय. पण हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने फेटाळलाय. ‘पुणे मतदार यादीतील घोळाला निवडणूक आयोग जबाबदार आहे. हा काँग्रेस राष्ट्रवादीचा कट नाही’ असं सांगत राष्ट्रवादीने विरोधी पक्षांचे आरोप बालिश असल्याची टीका पुणे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष वंदना चव्हाण यांनी केलीय पण वंचित मतदारांना त्यांचा मतदानाचा लोकशाहीचा हक्क मिळाला पाहिजे असंही त्या म्हणाल्या.

फेरनिवडणूक किंवा फेरमतदान करता येईल का हा निवडणूक आयोग कायदा पाहून ठरवेल असं सांगत राष्ट्वादीनं चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात ढकलला. पुणे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष वंदना चव्हाण यांनीही अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिलं. तर अनिल शिरोळे मात्र फेरमतदानावर आग्रही आहेत. आणि याबद्दल ते उद्या दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. भाजपच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि निवेदन दिलं. भाजपच्या तक्रारींची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्व अहवाल पाठवू असं आश्वासन राज्य निवडणूक आयोगानं दिलंय त्यामुळं मुख्य निवडणूक आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.

 

हे पण वाचा (संबंधित बातम्या)

पुणेकरांच्या तक्रारीचा जिल्हाधिकार्‍यांकडे पाऊस
पुणेकरांची सटकली, फेरमतदान घ्या !
‘यादीत नाव नसल्यास मतदारही जबाबदार’
मतदान यंत्रात घोळ, याद्यात नावंही गायब !
मतदान यंत्रात घोळ, भाजपचं मत काँग्रेसला !
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • namuchi

    बघा…आजून हि झोपलेच आहेत हे अति शहाणे….बातमीत म्हटलंय लाखो पुणेकर मतदानापासून वंचित राहिले…आता हे अनेकवचनी आहे तरीपण आपण लाख भरच धरुयात…आयोगाने तक्रार नोंदवायला सांगितले , वेळ वाढवून दिली तरी कितीजण आले – फक्त १००० जण….म्हणजे एक तर हे आळशी आहेत, अजूनही झोपले आहेत नाहीतर दुसरे असे कि media उगाचच बोंब मारताय कि लाख भर वंचित राहिले………. नक्की माहित नाही पण ज्या पद्धतीने media फेकू मोदीची तळी उचलून धरत आहे आणि प्रत्येक बाबती कॉंग्रेस बाबत संशय निर्माण करत आहे ते पाहता media नक्कीच आकडा फुगवून सांगत आहे……..

close