फिल्म रिव्ह्यु :’2 स्टेट्स’ !

April 18, 2014 11:44 PM1 commentViews: 3980

अमोल परचुरे, समीक्षक

बॉलीवूडमध्ये लव्हस्टोरीजची काही कमी नाही. हॅपी एंड पाहिजे, ट्रॅजिक एंड पाहिजे अगदी सगळ्या प्रकारच्या लव्हस्टोरी येऊन गेल्या तरी नवीन नवीन लव्हस्टोरी येतच असतात. आता ‘2 स्टेट्स’ तर चेतन भगतच्या याच नावाच्या अतिशय गाजलेल्या पुस्तकावर आधारित आहे. चेन्नईतली तामिळ मुलगी आणि दिल्लीतला पंजाबी मुलगा यांच्यातली ही लव्हस्टोरी.. दोन वेगळी राज्यं, तिथल्या लोकांच्या वेगवेगळ्या संस्कृती, आहार वेगळे. आता ते जुळवण्यासाठी हिरो-हिरोईनची धडपड..’मीट द पेरेंट्स’ सारखाच हा प्रकार. अभिषेक वर्मन या दिग्दर्शकानं पुस्तकावरुन स्क्रीनप्ले लिहीताना कन्टेन्टमध्ये फारसा बदल केलेला नाहीये. पुस्तकात जशी गोष्ट सांगितलीये त्याच घटना, तशाच फ्लोमध्ये सिनेमात मांडलेल्या आहेत. हे पुस्तक ज्या वयोगटातील वाचकांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय झालं, तोच वयोगट सिनेमा बनवतानाही डोळ्यासमोर ठेवण्यात आलाय. टीनएजर्स आणि शिक्षण संपवून नुकतेच नोकरीला लागलेले जे प्रेक्षक आहेत, त्यांना हा सिनेमा प्रचंड आवडणार आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना हा सिनेमा आपलंसं करू शकणार नाही.

काय आहे स्टोरी ?

states13-feb28 (1)ऋषी आणि अनन्या..आयआयएम (IIM) अहमदाबादमध्ये शिकत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात, लग्न करायचाही निर्णय घेतात, पण खरा प्रॉब्लेम पुढे असतो. ऋषी असतो पंजाबी तर अनन्या तामिळ ब्राम्हण कुटुंबातली. दोन्ही कुटुंबांना अर्थातच त्यांचं हे प्रेम मान्य नसतं आणि या दोघांनाही आपल्या कुटुंबाला दुखवून पळून जाऊन लग्न करायचं नसतं. दोन्ही कुटुंबांना पटवण्यासाठी मग हे दोघे काय काय करतात त्याची सगळी गंमत सिनेमात बघायला मिळेल. IIM मध्ये दोघांचं अफेअर वगैरे कसं सुरू होतं हा भाग थोडा कंटाळवाणा आहे.

नवीन काय?

state2-feb28

बरं, या दोघांनाही IIM मध्ये एकही मित्र किंवा मैत्रिण का नसते ते काही कळत नाही, पण जेव्हा त्यांच्या पालकांची एंट्री होते तिथून सगळी धमाल सुरू होते. ही सगळी धमाल संपल्यानंतर सिनेमा बराच रेंगाळतो तो एक प्रॉब्लेम आहेच. शंकर एहसान लॉयची गाणी लक्षात राहणारी नसली तरी सिनेमा जिथे रेंगाळतो तिथे वेग सावरण्याचं काम ही गाणी नक्कीच करतात. या सिनेमात भर देण्यात आलाय तो लव्हस्टेारीवर आणि त्या स्टोरीमध्ये असलेल्या मुख्य पात्रांवर, त्यामुळे सिनेमात येणार्‍या अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, मुंबई या शहरांचा स्वभाव दिसत नाही. नाव 2 स्टेट्स असताना दोन संस्कृतींमधली भिन्नता आणखी ठळकपणे यायला हवी होती.

परफॉर्मन्स

states7-feb28 (1)

अभिनयाबद्दल बोलायचं तर आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर या दोघांनी काम तर एकदम झकास केलंय. अलियाचा हा तिसरा तर अर्जुनचा चौथाच सिनेमा आहे. पण दोघांचीही अभिनयाची समज आता चांगलीच सुधारल्याचं जाणवतं. अमृता सिंगने पंजाबी आई मस्त ठसक्यात रंगवलीये आणि समंजस तामिळ आईच्या भूमिकेत रेवती शोभून दिसलीये. एकूणच सगळ्या कलाकारांचा अभिनय चांगला झालाय. 2 स्टेट्सचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे बिनोद प्रधान यांची सिनेमॅटोग्राफी.

रेटिंग 100 पैकी 60
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Amol Arade

    yek kahani ashi pan rahate

close