धमकी भोवली, अजित पवारांवर अदखलपात्र गुन्हा दाखल

April 19, 2014 3:38 PM4 commentsViews: 6083

ajit pawar on munde19 एप्रिल : “सुप्रिया सुळेंना मत नाही दिलं तर गावंच पाणी बंद करू” अशी धमकी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलीच भोवली आहे. बारामती मतदारसंघातील मासाळवाडीच्या गावकर्‍यांना दिलेल्या धमकी प्रकरणी पवारांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुणे ग्रामीण पोलिसांनी पुढच्या कारवाईसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल पाठवलाय. पण प्रचाराची वेळ संपल्यानंतरही अजित पवारांनी जाहीर सभा घेतल्याचं निष्पन्न झालेलं नाही. आपचे उमेदवार सुरेश खोपडे आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी पवारांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

एका व्हिडिओच्या आधारावर ही तक्रार दाखल करण्यात आली होती. या व्हिडिओत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना मतदान केलं नाही तर पाणी बंद करू, असं गावकर्‍यांना धमकावल्याचं दिसतंय. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानंही राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल मागवला आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांची पाठराखण केली असून त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचं शरद पवार म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Vilas Khole

  बातमी : ‘नासा’ ला पृथ्वी सारखा ग्रह सापडला ।!!!

  नोट : त्याचा सातबारा पवार साहेबांच्या नावावर आहे आणि पाणी पुरवठा अजित पवार करतात

 • pradip

  आता हार समोर दिसतीय ना म्हणून अश्या मार्गाचा अवलंब करत आहेत पण यांना बहुतेक माहित नाही वाटते. आत्ताचे मतदार गेल्या १० वर्ष्यापुर्वीच्या जनते पेक्षा जास्त समजदार आणि सुशिक्षित आहे. असल्या पोकळ धमक्यांना भिणार नाही. तोंडावर हो म्हणतील पण मतदान त्यांना हव्या त्याच उमेदवार ला देतील.

 • Gopal Mirge

  vinashkale viprit buddhi

 • SAMEER

  १ अजित पवार चा मोबाईल लोकेशन तपासून बघा तो त्या दिवशी कुठे होता ते कळेल
  २ मतदाराने मतदान मशीनवर मत दिल्यानंतर आपण कोणाला मत दिलय हे अजित पवारला कस काय कळणार होत याची चौकशी पोलिसांनी करावी
  ३ पोलिसाने तक्रार लवकर नोंदवून घेतली नाही , आणि पोलिस उप. निरीक्षक कारण सांगतो कि मी निवडणूकीच्या कामात व्यस्त होतो म्हणून , त्याला एवढ कळत नाही का हि तक्रार निवडणूक संदर्भातली होती . मतदाराला धमकी देणे ,त्यांच्या , त्यांना वेठीस धरणे हा गुन्हा आहे.
  ४ शरद पवार हा अजित पवारची कधी पाठराखण करत नाही तो नेहमीच त्याच्या फालतू कामाच्या पाठी खंबीरपणे उभा असतो .
  ५ जनतेने पाणी मागितलं कि अजित पवार हा मुतायला निघतो. अजित पवारच्या बदल्यात शरद पवार माफी मागतो . काय विनोदच आहे. महाराष्ट्राचा उप मुख्यमंत्री जेंव्हा अस वक्तव्य करतो तेंव्हा जनतेच रक्त सळसळ्ल का नाही ? जनता पेटून नाही उठला ? त्याला उप मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हायला का नाही भाग पडल ? ………………… कारण तो पाण्याचा प्रश्न फक्त एका जिल्ह्याचा होता म्हणून ………… जो पर्यंत समस्या आपल्या पर्यंत येत नाही तो पर्यंत आपले डोळे उघडत नाही

close