काश्मीरचा मुद्दा सोडवण्यासाठी मोदींनी पाठवले होते दूत -गिलानी

April 19, 2014 2:09 PM0 commentsViews: 1455

546gilani19 एप्रिल : काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मोदींच्या वतीनं दोन काश्मिरी पंडित आपल्याला भेटायला आले होते असा दावा फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी केला.

यासाठी मोदींशी भेट घालून देण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला होता. पण मोदींची राष्ट्रीय स्वय संघाची पार्श्वभूमी पाहता आपण तो प्रस्ताव फेटाळला असं गिलानींनी म्हटलंय.

पण गिलानी  याचा हा दावा धांदट खोटा असल्याचं भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय.काश्मीर प्रश्नाबाबत कोणतीही चर्चा गिलानींशी करण्याचा प्रश्नच येत नाही असंही भाजपने स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close