देशातल्या 40 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना अतिरेक्यांचा धोका – पी. चिदंबरम

April 2, 2009 6:27 AM0 commentsViews: 3

2 एप्रिल, दिल्ली आगामी निवडणुकीच्या काळात देशातल्या 40 अतिमहत्त्वाच्या (VVIP) व्यक्तींना अतिरेक्यांचा धोका असल्याची माहिती गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी दिली आहे. या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमध्ये अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि झेड प्लस सुरक्षा असणार्‍या नेत्यांचा समावेश आहे. गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी या 40 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पत्र पाठवून खबरदारी घेण्याची खबरदारी घेण्याची सुचना केली आहे. सुरक्षेसंदर्भात गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी अडवाणींचीही भेट घेतली.

close