अजितदादांनी धमकावलं नाही,मासाळवाडीकरांचं घूमजाव?

April 19, 2014 8:38 PM0 commentsViews: 5138

mashalwadi_baramti19 एप्रिल : बारामती जिल्ह्यातील मासाळवाडी गावं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वादग्रस्त विधानामुळे चांगलंच चर्चेत आलं. “सुप्रिया सुळेंना मत नाही दिलं तर गावंच पाणी बंद करू” अशी धमकी अजित पवार दिल्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली. पण ज्या गावावरुन हा वाद उफाळला. त्याच गावकर्‍यांनी आज (शनिवारी) मोर्चा काढून अजित पवारांनी धमकी दिली नाही असंच दाखवून दिलं.

मासाळवाडीच्या ग्रामस्थांनी आज (शनिवारी) बारामतीमध्ये उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढत मासाळवाडी ग्रामस्थांनी अजित पवारांनी धमकावल्याचे आरोप फेटाळले. या मोर्चामध्ये मासाळवाडीतील अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा जास्त भरणा होता.

बारामती जिल्ह्यातील मासाळवाडी गावं अजित पवारांच्या वादग्रस्त विधानामुळे चांगलंच चर्चेत आलं. “सुप्रिया सुळेंना मत नाही दिलं तर गावंच पाणी बंद करू” अशी धमकी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पवारांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे ग्रामीण पोलिसांनी पुढच्या कारवाईसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल पाठवला आहे. पण प्रचाराची वेळ संपल्यानंतरही अजित पवारांनी जाहीर सभा घेतल्याचं निष्पन्न झालेलं नाही. आपचे उमेदवार सुरेश खोपडे आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी पवारांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. एका व्हिडिओच्या आधारावर ही तक्रार दाखल करण्यात आली होती. तसंच राज्य निवडणूक आयोगानेही या प्रकरणाचा अहवाल मागावलं आहे. राष्ट्रवादीने मात्र अजित पवारांनी जोरदार पाठराखण केलीय.

अजित पवारांवरील आरोप खोटे आहेत असं शरद पवारांनी म्हटलंय. पण ज्या गावावरुन हा वाद उफाळला. त्याच गावकर्‍यांना आज मोर्चा काढून अजित पवारांनी धमकी दिली नाही असंच दाखवून दिलं. विशेष म्हणजे संदीप ठोंबरे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अजितदादांनी 2006 साली गावाला पाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं.

पण 8 वर्षंं उलटूनही पाणी नाही, गावाला पाणी कधी मिळणार ते सांगा असं विचारायंच धाडस या संदीप ठोंबरेनं दाखवलं होतं. पण आता संदीपनं घूमजाव करत अजित पवार हेच पाणी प्रश्न सोडवू शकतात असं सांगितलंय. या मोर्चात सहभागी झालेल्या काही गावकर्‍यांनी आपचे उमेदवार सुरेश खोपडे हे राजकीय स्वार्थापोटी आरोप करतायंत असंही म्हटलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close