अवकाळी पावसाचा तडाखा, 5 जणांचा बळी

April 19, 2014 9:43 PM0 commentsViews: 1760

19_april_belgaon_rain19 एप्रिल : राज्यातील काही भागाला पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, नेसरी, राधानगरी भागात जोरदार पाऊस झाला. बीड, जालना, बारामती, बेळगावलाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय.

गारपिटीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एका शेतकर्‍याचा मृत्यू झालाय. शेतात काम करताना गारपीट सुरू झाली आणि गारांच्या मार्‍याने त्याचा मृत्यू झाला. तर अहमदनगरमध्ये वीज पडून तिघांचा बळी गेलाय. सिंधुदुर्गात आंबोलीत गारांचा पाऊस सुरू झालाय तर मराठवाड्यात जालना जिल्ह्यात सुद्धा सलग दुसर्‍या दिवशी पाऊस झाला. नगर जिल्ह्यात वीज पडून तीन तरुणांचा मृत्यू झालाय.

बेळगाव शहरालाही सलग दुसर्‍या दिवशी पावसानं झोडपलंय. बीड जिल्ह्यातही आज अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालंय. बेळगाव शहरालाही सलग दुसर्‍या दिवशी पावसानं झोडपलं .विजेच्या कडकडाटासह तुफानी पावसाने पावसाने हाहाकार माजवला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. या पावसामुळे बेळगांव-वेंगुर्ला महामार्ग ठप्प झाला होता. आधीच गारपिटीनं त्रस्त झालेल्या शेतकर्‍याची निसर्गानं पुन्हा एकदा क्रूर चेष्टा केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close