पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरची वाहतूक पुन्हा सुरळीत

April 2, 2009 7:16 AM0 commentsViews: 3

2 एप्रिल पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे. कामशेत बोगद्याजवळ काल सकाळी सात वाजता क्वालिस आणि टँकरची धडक होऊन झालेल्या अपघातामुळे वाहतूक ठप्प होती. गॅसचा टँकर उलटून टँकरमधून गॅस गळती सुरू झाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्हीकडची वाहतुक बंद ठेवण्यात आली होती. परिणामी जुन्या महामार्गावरचीही गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी झाली होती. थोड्याचवेळापूर्वी हा टँकर हटवण्यात आला असून आता वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

close