मुख्यमंत्री अपघातातून थोडक्‍यात बचावले

April 20, 2014 11:20 AM1 commentViews: 3618

cm car accident20 एप्रिल : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पायलट कारला मुंबईतल्या कांदिवली इथं काल रात्री 8च्या सुमाराला अपघात झाला.  या दुर्घटनेत मुख्यमंत्र्यांच्या कारचे नुकसान झाले आहे. यातून मुख्यमंत्री थोडक्यात बचावले असून त्यांचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याला नजीकच्या सूचक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री पश्‍चिम उपनगरात गेले होते. त्यावेळी मालाड आणि कांदिवलीमधील एका सिग्नलजवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाने दुसर्‍या एका वाहनाला धडक दिली. या धडकेत मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा मागोमाग धडकला. तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात मुख्यमंत्र्यांच्या पायलट कारचा चालक जखमी झाला.

  • vinod patil dondaicha

    mela nhi ka ek congres ci ghan geli asati

close