ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अधिक शिरोडकर यांचे निधन

April 20, 2014 12:56 PM0 commentsViews: 339

adhik shirodkar 2  20 एप्रिल :  ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अधिक शिरोडकर यांचं काल रात्री वृद्धापकाळाने त्यांच्या मुंबईत रहत्या घरी निधन झाले. ते 82 वर्षाचे होते.

अधिक शिरोडकर 1996 ते 2001 या काळात ते शिवसेनेचे राज्यसभेतील माजी खासदार होते. त्यापेक्षा त्यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वकील म्हणून अनेकवेळा काम केले होते. तसेच ते एक छायाचित्रकार म्हणूनही प्रसिद्ध होते. शिरोडकर यांनी महानगर टेलिफोन निगमचे संचालक म्हणून 2002 ते 2005 काम पाहिले होते,
आज दु. 12 वाजता गिरगावमधल्या चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

close