काँग्रेसला धक्का; प्रकृती बिघडल्यामुळे सोनिया गांधींचा महाराष्ट्र दौरा रद्द

April 20, 2014 1:39 PM1 commentViews: 2045
sonia-and-rahul_350_08051301012120 एप्रिल :  प्रकृती बिघडल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आजचा नियोजित महाराष्ट्र दौरा रद्द केला आहे. आता त्यांच्याऐवजी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मुंबई दौर्‍यावर येणार आहेत.
सोनिया गांधी आज संध्याकाळी मुंबईसह धुळे आणि नंदूरबार इथे सभा घेणार होत्या मात्र आता त्यांच्याऐवजी राहुल गांधी महाराष्ट्र  दौर्‍यावर येणार आहेत. त्याआधी राहुल गांधींची आज राजस्थान आणि मध्य प्रदेश इथेही सभा होणार आहेत. त्यानंतर त्यांची मुंबईत सायंकाळी सभा होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार उपस्थित असणार आहेत.

 बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ही सभा होईल. मुंबईतल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहा मतदारसंघांतल्या सर्व उमेदवारांसाठी ही संयुक्त सभा असेल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही या सभेला असतील. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांसह अनेक महत्त्वाचे नेते या सभेला हजर राहणार आहेत

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील तिसर्‍या टप्प्यातील प्रचारासाठी कॉंग्रेस आणि भाजपने आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईकरांसाठी सुट्टीचा दिवस असला तरी राजकारण्यांसाठी सुपर संडे आहे. सोनिया गांधींऐवजी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सभा घेणार आहेत. तर याठिकानी उद्या (सोमवार) भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या आठवड्यात सर्वच पक्षांचे नेते मुंबई, ठाणे आणि नाशिक भागांत प्रचार सभा घेणार आहेत.

  • yogesh punde

    ok…shetakari punha aatmhattya karanar vatat…

close