21 कोटींवरून 2 हजार 445 कोटी झाली कशी ? – राज ठाकरे

April 20, 2014 12:41 PM0 commentsViews: 7349

raj thacktray 20 एप्रिल :   पाच वर्षांपूर्वीच्या 21 कोटींवरून 2445 कोटींपर्यंत संपत्ती जमवणार्‍या छगन भुजबळांची चौकशी सुरू आहेच, पण इंडोनेशियात कोळसा खाणींसह सिंगापुरात गुन्हा दाखल असलेल्या भुजबळांनी स्वतःच्या संपत्तीवर कुटुंबातील सदस्यांची नावे टाकून स्वतःचा जीव वाचविण्याची धडपड चालविली आहे,’ असा घणाघाती आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल येथे केला.

मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारार्थ काल नशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्‍लब) मैदानावर राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. शिवसेना फोडून बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या भुजबळांना उद्धव ठाकरे यांनी घरी जेवायला बोलावल्याचा आरोपही त्यांनी केला.

एकीकडे भुजबळांना लक्ष्य करतानाच, दुसरीकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या खंजीर खुपसल्याच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्याची संधी सोडली नाही. ‘छगन भुजबळांनी शिवसेना फोडली, शिवसेनाप्रमुखांना अटकेसाठी खटला भरला, गृहमंत्री असताना त्यांचा अपमानास्पद ‘टी. बाळू’ असा उल्लेख करून शिवसेनाप्रमुखांचा अवमान केला, त्यांना अटक केली, अशा भुजबळांना उद्धव ठाकरे यांनी घरी नेऊन जेवू घातले, अशा तोफ डागली’ अशी टीका त्यांनी केली.

close