देशात भाजपची लाट आहे, हे बघितल्यावर पवार मैदान सोडून पळाले – मोदी

April 20, 2014 5:46 PM0 commentsViews: 4178
Modiddddd20 एप्रिल : ‘देशात भाजपची लाट आहे, हे बघितल्यावर पवार मैदान सोडून पळाले’, असं मोदी यांनी म्हटलं आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जळगावमधल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शरद पवार यावेळी लोकसभा निवडणूक लढवत नाही आहेत. जळगावमध्ये भाजपचे उमेदवार अशोक पाटील आणि रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्यासाठी त्यांनी सभा घेतली.
देशातल्या सर्व अडचणींचं कारण हे या मायलेकाचं सरकार आहे, ह्या सरकारला कायमचं विदा करा, असं आवाहन मोदींनी केलं. आपला स्वतःचा मतदारसंघ असलेला अमेठी न सांभाळू शकणारे देश कसे काय सांभाळू शकतील, असा प्रश्न उपस्थित करत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली.
छत्तीसगडमध्ये बिश्रामपूर या ठिकाणी जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ते काँग्रेसवर जोरदार हल्ला करत म्हणाले, ”काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अमेठीत माझ्या मुलाला सांभाळून घ्या असे भावनिक आवाहन करतात. पण, जी व्यक्ती अमेठी सांभाळू शकत नाही ती व्यक्ती देश कसा सांभाळू शकतील. काँग्रेसचे सरकार गेल्याशिवाय देशाचे भले होणार नाही. दिल्लीत डॉ. मनमोहनसिंह यांची सत्ता नसून आई आणि मुलाची सत्ता आहे.”
देशात महिलांवर अत्याचाराच्या सर्वाधिक घटना काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये घडतात असा आरोपही, मोदींनी केली. संजय बारुंच्या वादग्रस्त पुस्तकावरुनही मोदींनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली.
close