येणार्‍या निवडणूकीत आम्हीच ‘तुम्हाला’ पाणी पाजू – मुंडे

April 20, 2014 5:15 PM0 commentsViews: 2080

gopinath munde20 एप्रिल :  मतदानासाठी गोरगरीब जनतेला धमकावणार्‍या अजित पवारांनाच लोकसभा आणि येणार्‍या विधानसभा निवडणुकीत पाणी पाजू असे सांगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते पैठणमध्ये बोलत होते.

जालना येथील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी गोपीनाथ मुंडेंनी रविवारी जालना येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर जोरादर टीका केली. निवडणुकीत न लढवणार्‍या उद्धव ठाकरेंवर टीका करणार्‍या शरद पवारांनी आधी त्यांनी लोकसभेतून राज्यसभेत का पळ काढला असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर महायुतीचं सरकार आलं तर गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं.

तर मुंडेच्या टीकेला अजित पवारांनी नांदगावमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. मुंडेना स्वतःचा पुतण्या सांभाळता येत नसेल तर आमचा काय दोष ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उद्धव नव्हे उद्धट – पवार
रविवारी खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची रायगड मतदारसंघातल्या सुनील तटकरे यांच्या प्रचारसभेसाठी आलेल्या शरद पवारांनी पुन्हा एकदा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. ‘बालका, एकदा तरी निवडणूक लढून दाखव’, अशी खिल्ली उडवत पवारांनी आव्हान दिलं. ‘बाळासाहेबांनी कष्ट करून शिवसेना उभारली, उद्धव मात्र आयत्या पिठावर येऊन बसलेत’, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

close