विश्वजीत कदमांना पेड न्यूज भोवणार ?

April 20, 2014 5:54 PM0 commentsViews: 4491

vishwajeet kadam20 एप्रिल :  निवडणूकीच्या प्रचारासाठी पेड न्यूजचा वापर केल्याचा ठपका काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार विश्वजित कदम यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जिल्हा पेड न्यूज कमिटीने याबाबतचा अहवाल राज्याच्या समितीकडे पाठवला आहे. पेड न्यूजसंदर्भातील राज्य समितीनेही कदम यांच्यावर ठपका ठेवत त्यांची याचिका शनिवारी फेटाळून लावली.

पुण्यातील एका वर्तमानपत्रात विश्वजित कदमांची बातमी आली होती. त्यावरुन हा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेण्यावाचून कदम यांच्याकडे गत्यंतर नसून तेथेही विरोधात निकाल आल्यास कदम यांची उमेदवारीच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहेत.

मतदानासाठी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी विश्वजीत कदम यांच्याविरोधात अगोदरच गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता पेड न्यूज प्रकरणातही कदम अडचणीत सापडले आहेत.

close