निवडणूक बंदोबस्तासाठी आलेले होमगार्ड निराधार

April 20, 2014 5:50 PM1 commentViews: 936

20 एप्रिल :  निवडणूक बंदोबस्तावरच्या पोलिसांना, होम गार्ड्सना अनेकदा अडचणींचा सामना करायला लागतो. कल्याणमध्येही असंच एक वास्तव समोर आलंय. इथे निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या 300 होमगार्डची राहण्याची, जेवण्याची किंवा आंघोळीचीही कोणतीही सोय ठाणे पोलिसांनी केलेली नाही. त्यामुळे होमगार्ड्सवर महात्मा फुले पोलीस ठाण्याजवळच्या उद्यानात झोपण्याची वेळ आली आहे. बंदोबस्तासाठी आलेल्या होमगार्डची सोय पोलीस प्रशासनाने करणे अपेक्षित असतं पण 24 एप्रिलला होणार्‍या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या या होमगार्ड्सना कोणत्याही सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीयेत.

  • umesh jamsandekar

    काय अवस्था आहे आमच्या सुरक्षा व्यवस्थेची हे यावरूनच कळते. स्वताच्या घरच्यांचं तुटपुंज्या पगारामुळे पोट भरू न शकणारे आणि कामावर असताना भिकारयाची वागणूक मिळणाऱ्या या सुरक्षा रक्षकांकडून कसली अपेक्षा करायची. ह्यांना अशी वागणूक देणाऱ्या स्थानिक पोलीस प्रशासनावर गुन्हे दाखल करा आणि शिक्षा म्हणून यांना एक वर्ष फुटपाथवर झोपायला सांगा तरच ह्यांच्यातली माणुसकी जागी होईल.

close