फिक्सिंग प्रकरणात नवीन चौकशी समिती स्थापन

April 20, 2014 7:30 PM0 commentsViews: 366

Image img_172312_bcci_240x180.jpg20 एप्रिल :  सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करत आयपीएल फिक्सिंग व बेटिंग प्रकरणात बीसीसीआयने नवीन चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री, सीबीआयचे माजी संचालक आर.के. राघवन आणि हायकोर्टाचे माजी न्या. जे एन पटेल या तिघांचा या समितीत समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत बीसीसीआयची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. एन श्रीनिवासन यांच्यासंदर्भात आज कोणताही निर्णय झाला नाही  पण नवीन चौकशी समितीचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयपीएलमधील फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणात निष्पक्ष चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने मुदगल समितीने नेमणूक केली होती. मुदगल समितीने याप्रकरणी सुप्रीम कोर्टात एक गोपनीय अहवाल सादर केला होता. यात बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्यासह १३ जणांवरही संशय व्यक्त करण्यात आला होता. या सर्वांच्या चौकशीसाठी बीसीसीआयनेच चौकशी समिती नेमावी असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.

close