आर्थर रोड जेलमध्ये सवलतींच्या बदल्यात घेतले जातायेत पैसे

April 20, 2014 8:35 PM0 commentsViews: 379

सुधाकर काश्यप, मुंबई.
20 एप्रिल :  आर्थर रोड जेलचा अधीक्षक वासुदेव बुरकुले याच्या घरात लाखो रुपयांची रोकड सापडली आहे. या घटनेमुळे आर्थर रोड जेलमधल्या गैरप्रकाराची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जेल मध्ये असलेल्या गँगस्टरांच्या माध्यमातून ही रक्कम गोळा करण्यात आली होती असा संशय व्यक्त केला जात आहे.

जेल मध्ये एन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकार्‍यांना काल खजिनाचं सापडला. जेल चा अधीक्षक वासुदेव बुरकुले याच्या घरात या पैशाच्या थप्प्या होत्या. चाळीस लाख रुपये होते. हा पैसा जेल मध्ये कसा आला , कोणत्या कारणासाठी आला , कुणाचा पैसा आहे असे अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत. आर्थर रोड जेल मध्ये पूर्वी खून झाले आहेत. हल्ले झाले आहे. धारदार वस्तू सापडल्या आहेत. यानंतर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा सापडला आहे.

आर्थर रोड जेल चे सुप्रीटेंडट वासुदेव बुरकुले यांच्या घरी 40 लाख रुपये सापडल्या नंतर आर्थर रोड जेल मध्ये सुरु असलेल्या बाजाराची चर्चा सुरु झाली आहे. जेल मध्ये कैद्यांना सुविधा देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे उकळले जायचे असं म्हटलं जातंय.बुरकुले याच्या घरात सापडलेले पैसे हे कैद्यांकडून सुविधा मिळवण्याच्या बदल्यात घेतलेले पैसे होते का याचा आता तपास सुरु झाला आहे.आणि हा तपास मुंबई क्राईम ब्रँचच करत आहे.

जेल मध्ये सर्वकाही मिळत असतं.बाहेर 500 रुपयांना मिळणारी दारु जेल मध्ये 5000 हजार रुपयांना मिळते.

जेल आधिकारी आरोपींना वेगवेगळ्या सुविधा देत असतात.त्या बदल्यात मोठी रक्कम उकळत असतात.त्या सुविधा प्रामुख्याने अशा आहेत.
* कैद्यांना हॉस्पीटलला पाठवनेे
* कोर्टात पाठवने
* मुलाकात देण्यासाठी वेळ देने
* घरचं जेवन मिळण्यासाठी

या प्रत्येक व्यवस्था पाहणार्‍या अधिकार्‍यास त्याचे हात ओले केल्या शिवाय आरोपींना सवलत मिळत नाही. संबधीत अधिकारी एक ठराविक रक्कम आरोपींकडून उकाळत असतो.मग त्यातील ठराविक हिस्सा जेल अधिकक्षक आणि इतर अधिकार्‍यास दिला जात असतो.या व्यवस्थे व्यतिरिक्त हि अनेक सुविधा आरोपींना मिळत असतात. बुरकुले यांच्या पैशाचा स्त्रोत नेमका काय होता. याचा तपास सुरु झाला आहे.

राज्यातील जेल मध्ये सर्वात जास्त बदनाम आर्थर रोड जेल आहे.अनेक मोठे गुंड आपल्याला आर्थर रोड जेल मध्येचं ठेवाव, अशी मागणी करत असतात. मुंबईत 1993 सालात झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपी मुस्तफा डोसा याने आपल्याला आर्थर रोड जेल मध्येच ठेवण्यात यावं , यासाठी कोर्टात याचिका केली होती. या जेल मध्ये योग्य प्रकारे कारवाई झाल्यास त्यातून अनेक गंभीर गोष्टी बाहेर येतील , असं म्हटलं जातंय.

जेलमधला गैरप्रकार- सुविधांसाठी लाच

  •  कैद्यांना हॉस्पिटलला पाठवणं
  •  कैद्यांना कोर्टात पाठवणं
  •  मुलाखत देण्यासाठी वेळ देणं
  •  घरचं जेवण मिळण्यासाठी प्रयत्न

जेलमधला गैरप्रकार- लाचखोरीची साखळी

  •  संबंधित अधिकारी आरोपींकडून ठराविक रक्कम घेतो
  •  ठराविक हिस्सा अधीक्षक, इतर अधिकार्‍यांना दिला जातो
close