राहुल यांच्या सभेला पवारांची दांडी

April 21, 2014 9:43 AM0 commentsViews: 943

If_Congress_Doe9621 एप्रिल :  कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या मुंबईच्या पहिल्यावहिल्या संयुक्त प्रचार सभेला सोनिया गांधी यांच्या आजारपणाने नाट्यमय वळण लागले.

एकीकडे विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लक्ष्य करताहेत, तर दुसरीकडे आघाडीतल्या कुरबुरी काही कमी होताना दिसत नाही. सोनिया गांधी अनुपस्थित असल्याने केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ऐनवेळी या सभेला दांडी मारली. त्यांचं हेलिकॉप्टरच्या घोळामुळे ते गैरहजर राहिल्याचं जयंत पवार यांनी सांगितलं.

या सभेला मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, नारायण राणे हजर आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटीलही या सभेला उपस्थित होते. पण, पवार न आल्यानं आघाडीतल्या मानापमान नाट्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.

मुंबईतील सभेला सोनिया गांधी यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपस्थित राहणार होते. मात्र काल सकाळी अचानक सोनिया गांधी यांची तब्येत बरी नसल्याने त्या सभेला येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले, आणि त्यांच्याऐवजी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सभेला उपस्थित राहणार असल्याने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या राजकीय ज्येष्ठत्व आणि राजशिष्टाचार याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले.
सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी याअगोदर अनेक वेळा एकत्रपणे राजकीय सभा केलेल्या आहेत. मात्र आज सोनियांच्या अनुपस्थितीत राहुल गांधी यांच्या व्यासपीठावर शरद पवार जाणार काय, या राजकीय चर्चेने आघाडीत खळबळ उडाली होती. राहुल गांधी निव्वळ खासदार असून, शरद पवार केंद्रातील ज्येष्ठ मंत्री आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत शरद पवार यांनी अनेक वेळा प्रश्‍न उपस्थित केला आहे.
या सभेमध्ये शरद पवार उपस्थित राहिले असते; तर राहुल गांधी यांच्याअगोदर त्यांना भाषण करावे लागणार होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज पवार उपस्थित राहतील का, असा प्रश्‍न आघाडीच्या कार्यकर्त्यांसमोर उभा होता, पण शरद पवार यांनी या सभेला गैरहजर राहत पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्‍नचिन्ह कायम असल्याचेच संकेत दिल्याची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

 

close