मुन्नाभाई झाला सपाचा सरचिटणीस

April 2, 2009 9:04 AM0 commentsViews: 3

2 एप्रिलसुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे लोकसभेची उमेदवारी न मिळालेल्या संजय दत्तवर आता समाजवादी पार्टीने राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवलीय. गुन्हेगार म्हणून ठपका असलेल्या संजय दत्तला निवडणुकांदरम्यान पक्षाच्या प्रचारमोहिमेनिमित्ताने गांधिगिरी करण्यासाठी सपाने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे. आता सुप्रीम कोर्टाकडूनच क्लिन चीट मिळाल्यामुळे सपाने सोपवलेल्या या सरचिटणीसपदाच्या जबाबदारीमधे संजय दत्तचा नेमका रोल काय असणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. सपाने संजय दत्तवर सरचिटणीसपदाच्या रुपाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. आज नवी दिल्लीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. त्याचवेळी संजय दत्तने निरुपम यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. संजय निरुपम यांना पक्षात घेण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेमुळेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता, असं खळबळजनक विधानही काल संजय दत्तने केलं होतं. यापूर्वी अभिनेता संजय दत्तच्या लोकसभा उमेदवारीला सीबीआयनं विरोध केला होता. यासंदर्भात सीबीआयच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या वकिलांचा सल्लाही घेतला होता. पण सुप्रीम कोर्टाने मात्र संजय दत्तला निवडणूक लढवण्यास मनाई केली होती. तरीही समाजवादी पक्षातर्फे संजय दत्त निवडणूक लढवण्यासाठी खिंड लढवत होता आणि त्यासाठी त्याने कोर्टाकडून परवानगीही मागितली होती. अखेरीस काँग्रेसवरही खार खाल्लेल्या संजय दत्तला लोकसभेची उमेदवारी नाहीच ; मात्र समाजवादी पार्टीच्या सरचिटणीसपदाचं लोढणं त्याच्या नक्कीच गळ्यात पडलंय.

close