मलेशिया एअरलाईन्सच्या विमानाचे ईमरजन्सी लँडिंग

April 21, 2014 10:13 AM0 commentsViews: 3206
malaysia mh 192  20 एप्रिल :  मलेशियाहून बंगळुरला येत असलेल्या विमानात बिघाड झाल्याचे लक्षात येताच विमानाचे पुन्हा क्वालालंपूर विमानतळावर ईमरजन्सी लँडिंग करण्यात आले. यामुळे मोठी दुर्घटना सुदैवाने टळली.
स्थानिक वेळेनुसार रविवारी मध्यरात्री क्वालालंपूर विमानतळावरून बंगळुरूकडे उड्डाण घेतलेले ‘एमएच 192′ या विमानाच्या चाकातबिघाड असल्याच वेळीच लक्षात आल्याने लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व 166 प्रवासी सुखरुप आहेत. हे विमान रविवारी रात्रीच बंगळुरला पोहोचणार होते.
यापूर्वी मलेशिया एअरलाईन्सचे ‘एमएच 370′ हे विमान बेपत्ता झालेले आहे. अनेक दिवसांच्या शोधमोहीमेनंतर विमानाचा हिंदी महासागरात कोसळून अपघात झाल्याचे मलेशियन सरकारने म्हटले आहे. हे विमान क्वालालंपूरहून बिजींगकडे जात होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close