मोदींचे सूचक बनण्यास खान यांच्या मुलाचा नकार

April 21, 2014 11:11 AM0 commentsViews: 1481
Zamin Husain Bismillah21 एप्रिल : प्रसिद्ध सनईवादक बिस्मिल्लाह खान यांचा मुलगा उस्ताद जामीन हुसैन यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे वाराणसीत सूचक बनण्यास नकार दिला आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून निवडणूक लढवत  आहेत. मोदी 24 एप्रिलला वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बिस्मिला खान यांच्या कुटुंबीयांना मोदी यांचे सूचक बनण्याचा प्रस्ताव दिला होता.  बिस्मिला खान यांचा मुलगाउस्ताद जामीन हुसैन यांनी मोदींचे सूचक बनण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.
भाजपच्या नेत्यांनी आपल्याला बोलावलं तेव्हा एखाद्या कार्यक्रमाची चर्चा करायची असेल असं मला वाटलं होतं, प्रत्यक्षात त्यांनी आपल्यासमोर सूचक बनण्याचा प्रस्ताव ठेवला असं हुसैन यांनी सांगितलं. आमचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित असून, आतापर्यंत आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. ‘ असंही ते म्हणाले

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close