वादळी वार्‍यासह गारपिटीचाही तडाखा

April 21, 2014 8:58 AM0 commentsViews: 633

osmanabad21 एप्रिल : उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब, भूम, परंडा आणि वाशी तालुक्यात वादळी वार्‍यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून तुरळक पाऊस पडला होता पण आता झालेल्या पावसानं कहर माजवला आहे.

या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं नसलं तरी जिल्ह्यातल्या आंबा आणि द्राक्षांच्या बागांचं मोठं नुकसान झाल आहे. आंबेजवळगा आणि गुंजेवाडी या दोन तालुक्यामध्ये तर गारपीटही झाल्याची महिती आहे.

close