बीडमध्ये आंधळेवाडीत गुरूवारी फेरमतदान

April 21, 2014 1:07 PM0 commentsViews: 3082
sc-asks-ec-to-install-electronic-voting-machines-issuing-paper-receipts-to-voters-for-2014-polls_08101301052921 एप्रिल :   बीडमधील आंधळेवाडी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदानकेंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याचा गुन्हात दहा जणांना पोलिसांनी अटक केली असून आष्टी न्यायालयाने त्यांना 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर इथे फेरमतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील तिसर्‍या टप्प्यात अर्थात 24 एप्रिल रोजी आंधळेवाडी येथे फेरमतदान होणार आहे. बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ही माहिती दिली आहे.
बीड जिल्ह्यात 17 एप्रिल रोजी मतदान झाले. या मतदाना दरम्यान आंधळेवाडीच्या मतदान केंद्रावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता आणि मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या गोंधळात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाला. या गोंधळात ईव्हीएम मशीनची बटणं दाबली गेली आणि प्रत्यक्ष लोकसंख्येपेक्षा 8 मतं जास्त नोंदवली गेली. त्याची नोंद घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाकडे फेरनिवडणुकीची मागणी केली होती. त्यामुळ येत्या २४ एप्रिल रोजी आंधळेवाडी या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात येणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close