वरूण गांधींची सुनावणी 13 एप्रिलला

April 2, 2009 9:32 AM0 commentsViews: 5

2 एप्रिल, पिलिभित वरूण गांधींवर लावण्यात आलेल्या रासुका कायद्या विरोधातल्या याचिकेवरची सुनावणी सुप्रीम कोर्टाने 13 एप्रिलला ढकलली आहे. उत्तरप्रदेशातल्या मायावती सरकारनं वरूण यांच्यावर रविवारी रासुका म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावला आहे. प्रक्षोभक भाषण प्रकरणी वरूण यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना तुरूंगात जावं लागलं होतं. कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला असला तरी रासुकामुळे ते तुरूंगातच आहेत. त्या संदर्भातली सुनावणी आज गुरूवारी होणार होती. पण आता ती 13 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.

close