गोंदिया छपरा एक्स्प्रेसचे पंखे चोरीला

April 21, 2014 4:00 PM0 commentsViews: 197

21 एप्रिल :  गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रेल्वेनं गोंदिया मुझफ्फरपूर छपरा एक्स्प्रेस मोठ्या थाटात सुरू केली. पण भर उन्हाळ्यात या गाडीतले पंखेच चोरीला गेलेत. आणि यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतायेत. आम्ही पूर्ण भाडं देतो, मग आम्ही हे चटके का सहन करायचे, असा सवाल प्रवासी करतायेत. यामुळेच काही संतप्त प्रवाशांनी काल गोंदिया रेल्वे स्टेशनमध्ये धिंगाणा घातला. रेल्वे प्रशासनाने मात्र या प्रकरणाची दखल अजूनही घेतलेली नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close