जगदीश टायटलर यांना सीबीआयनं दिली क्लीन चिट

April 2, 2009 9:32 AM0 commentsViews: 1

2 एप्रिल1984 च्या शिख विरोधी दंगलीप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जगदीश टाइटलर यांना सीबीआयनं क्लीन चिट दिली आहे. त्यांच्याविरुध्द कोणतेही पुरावे नसल्याचं सीबीआयनं सादर केलेल्या अंतिम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय. सीबीआयनं आपला अंतरिम रिपोर्ट आज सुप्रीम कोर्टापुढे सादर केला असून या रिपोर्टमुळे उत्तर-पूर्व दिल्लीतून लोकसभेची जागा लढवणा-या टायटलर यांना दिलासा मिळाला आहे.

close