मोदीच वेगवेगळ्या प्रकरणात संभाव्य आरोपी -सिब्बल

April 21, 2014 4:37 PM0 commentsViews: 672

346kapil sibal_mulyam_5221 एप्रिल : संसद गुन्हेगारमुक्त करण्याचं आश्वासन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आपल्या प्रचार सभांमध्ये देत आहेत. यावर काँग्रेसने कडाडून टीका केलीय.

खुद्द नरेंद्र मोदी हे सोहराबुद्दीन, कौसर बी आणि तुलसी राम प्रजापती या तीन हत्यांच्या प्रकरणात संभाव्य आरोपी आहेत अशी कडवट टीका काँग्रेसचे नेते कपील सिब्बल यांनी केलीय.

सिब्बल यांनी आज (सोमवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीबीआयच्या चार्जशीटमधले काही मुद्देही नमूद केले. मोदींचे जवळचे सहकारी अमित शाह आणि विशेष अधिकारी पराग शाह हे हत्याकांड घडवणार्‍या अधिकार्‍यांच्या सतत संपर्कात होते असाही त्यांनी आरोप केला.

संसदेमध्ये एकही गुन्हेगार नसेल असा दावा मोदींनी केला होता. भाजपमधल्या भ्रष्टाचार्‍यांचीही गय केली जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close