पुणे मतदार यादी घोळ प्रकरणी जनहित याचिका दाखल

April 21, 2014 6:30 PM0 commentsViews: 404

46nagpur_voting_issiue21 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी मागील आठवड्यात झालेल्या मतदानात लाखो पुणेकरांना मतदान करता आले नव्हते. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहेत.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रताप गायकवाड यांनी ही याचिका दाखल केलीय. मतदारांची नाव वगळण्यासाठी जबाबदार असणार्‍या सरकारी अधिकार्‍यांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात 17 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दुसर्‍या टप्प्यात मतदान पार पडलं. मात्र पुण्यात लाखो मतदारांची नावंच यादीतून गायब झाल्याचं समोर आलं. एवढंच नाही तर एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याचं समोरं आलं होतं. मतदानाचा हक्क बजावता न आल्यामुळे संतप्त पुणेकरांनी आंदोलन पुकारले होते. पुण्यात फेरमतदान घ्या अशी मागणी पुणेकरांची आहे. यासाठी भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी एकदिवशी उपोषणही केले होते.

पुणेकरांच्या आंदोलनाची दखल घेऊन निवडणूक आयोगाने अहवाल मागवला आहे. पण या प्रकरणी आता जनहित याचिकाही दाखल करण्यात आलीय. बीडमध्ये आंधळेवाडीत फेरमतदान घेण्याचे आदेश आयोगाने दिले आहे त्यामुळे आता पुण्यातही फेरमतदान होणार काय याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

हे पण वाचा (संबंधित बातम्या)

पुणेकरांच्या तक्रारीचा जिल्हाधिकार्‍यांकडे पाऊस
पुणेकरांची सटकली, फेरमतदान घ्या !
‘यादीत नाव नसल्यास मतदारही जबाबदार’
मतदान यंत्रात घोळ, याद्यात नावंही गायब !
मतदान यंत्रात घोळ, भाजपचं मत काँग्रेसला !

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close