गारपिटी पक्षांच्या जीवावर

April 21, 2014 8:36 PM0 commentsViews: 218

21 एप्रिल : उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब,भूम, परंडा आणि वाशी तालुक्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे नुकसान झालं नसलं तरी जिल्ह्यातल्या आंबा आणि द्राक्षांच्या बागांचं मोठं नुकसान झालंय.आंबेजवळगा आणि गुंजेवाडी या दोन गावांमध्ये तर गारपीटही झाली. जवळपास दीड किलोमीटर भागात गारांचा खच पडला. त्यामुळे आंबा, द्राक्ष, कणसं या पिकांचं मोठं नुकसान झालं. अनेक घरांवरची पत्रे उडाली. चिमण्याही मोठ्या प्रमाणात मरुन पडल्या. उस्मानाबाद कळंब परडा परिसरात भूम परिसरात जोरदार पाऊस झाला हा पाऊस मध्यरात्रीपर्यंत सुरू होता या पावसाने अनेक झाडे मुळापासून उन्मळून रस्त्यावर पडली आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणूक होती तर सगळे राजकीय पुढारी अधिकारी या अगोदर तात्काळ पाहणी करण्यासाठी येत होते. आमच्याकडे 24 तासापेक्षा जास्त कालावधी झालाय गारपीट होऊन मात्र आता पर्यंत 1 जण सुद्धा फिरकला नाही अशी नाराजी शेतकरी व्यक्त केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close