लॅक्मे फॅशन वीक : अक्षयकुमार आणि आयोजकांविरोधात अश्लिलता पसरवण्याची तक्रार

April 3, 2009 4:37 PM0 commentsViews: 11

2 एप्रिल लॅक्मे फॅशन वीक बॉलिवुडमधल्या जान्यामान्या कलाकारांच्या स्पेशल परफॉर्मन्सने नुसताच गाजला नाही तर चांगलाच वादातीत ठरला. अक्षय कुमारआणि ट्विंकल खन्ना या दोघांवर अश्लीलतेचा आरोप केला असून वाकोल्यातल्या स्थानिकांनी आयोजकांबरोबरच या दोघांविरोधात अश्लिलता पसरवण्याची तक्रारही दाखल केली आहे. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाला त्यांचा ऑनस्टेज 'unbuttened' रोमॅण्टिकपणा भलताच नडला. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये अक्षय कुमारने 'unbuttened' जिन्सचं प्रमोशन करताना आपली पत्नी ट्विंकल खन्नाकडून जाहीररित्या जीन्सचं बटण उघडलं होतं. यावर गहजब होऊन त्यांच्याविरोधात वाकोल्यातल्या रहिवाशांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय.

close