राज्यात जास्त टोल घेतल्याचं सिद्ध केलं तर राजकारण सोडेन -भुजबळ

April 22, 2014 12:59 PM2 commentsViews: 1224
Image img_36162_chaganbujbal_240x180.jpg22 एप्रिल :  राज्यात गुजरातपेक्षा एकरूपयाही टोल जास्त घेतला जात नाही जर गुजरातपेक्षा मराहाष्ट्रात टोल जास्त वसूल होतो हे सिद्ध करूण दाखवा मी राजकारण सोडेन असं जाहिर आव्हान सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना दिलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या प्रचारसभेत  छगन भुजबळांनी टोलच्या मुद्यावरून त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांचे राजकीय संबंध फारसे चांगले नाहीत, हे सर्वांना माहित आहे. आपल्या सभांमध्ये राज ठाकरे नेहमीच भुजबळांवर टीका करतात, त्यांची नक्कलही करतात. राज ठाकरे यांच्याकडून लक्ष्य होत असलेले भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या टीकेला चोख प्रत्त्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईतल्या सभेत राज ठाकरेंनी भुजबळांच्या वाढलेल्या संपत्तीचा मुद्दा उपस्थित केला. तर नाशिकच्या सभेत भुजबळही खूप आक्रमक झाले आणि राज ठाकरेंवर वेगवेगळ्या मुद्यांवरून जोरदार टीका केली. आपल्या सभेत ते सतत राज यांचा एकेरी उल्लेख करत होते.
कोहिनूर मिलची जागा 420 कोटी रुपयाला विकत घ्यायला पैसा कुठून आणलेस, असा सवाल त्यांनी राजना केला. त्यावर ‘माझ्यावर कोट्यवधींचा संपत्ती जमविल्याचा आरोप करणार्‍या राज ठाकरेंनी कोहिनूर मिल घेण्यासाठी 400 कोटी रुपये व दुबईत मॉलसाठी कोट्यवधी रुपये कुठून आणले?’ असा प्रश्न छगन भुजबळांनी राज ठाकरे यांना जाहीर सभेत विचारला.  राज ठाकरे यांच्या घरासमोरच दादर येथे चैत्यभूमी आहे. मात्र आजवर ते कधीही तेथे साध्या दर्शनालाही गेले नाहीत. अशा लोकांनी आम्हाला फुले-शाहू -आंबेडकर शिकवू नयेत, असेही त्यांनी सुनावले.
त्याचं बरोबर, बाळासाहेबांनी मला हाक मारली, तेव्हा मी गेलो.  राज, बाळासाहेबांनी तुम्हांला किती वेळा हाक मारली? ‘या चिमण्यांनो परत फिरा रे घरट्याकडे आपुल्या’, असे भावनिक आवाहन करूनही चिमणा काही परत गेलाच नाही अशी बोचरी टीका ही भुजबळांनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sachin Kanawade

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हि संधी सोडू नाय …जर खरच राज ठाकरें साहेबांकडे पुरावे असतील त्यांनी भुजबळांचे पतन करावे

  • rakesh dalvi

    poorave sadar kara nahi tar vishay soda, milaleli sandhi sodu naka sidhha kara aple khare pan

close