युतीने सरकार स्थापनेसाठी दिली होती ऑफर -पवार

April 22, 2014 1:55 PM0 commentsViews: 2896

184506322 एप्रिल : निवडणुका चालू आहेत आणि राजकीय नेत्यांच्या आरोप आणि दाव्यांना ऊत आला आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसने विधानसभेची निवडणूक वेगवेगळी लढवली होती. निकालानंतर भाजपा- शिवसेना युतीच्या काही नेत्यांनी सरकार स्थापन करण्याची आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर राष्ट्रवादीला दिली होती पण जातीयवादी पक्षांसोबत जायचे नाही म्हणून आम्ही ही ऑफर नाकारली असा गौफ्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. लोकमत वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

त्यावेळी युतीसोबत जाऊन मुख्यमंत्रीपद घेण्याऐवजी कॉग्रेससोबत जाऊन आम्ही उपमुख्यमंत्रीपद घेतले असं पवारांनी या मुलाखतीत स्पष्ट केले. या आधी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी पवार हे युतीसोबत येण्यास इच्छुक होते असं सांगत नव्या राजकीय चर्चेला तोंड फोडलं होतं.

युपीएची सत्ता परत येईलच असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. परंतु कॉग्रेसला किंवा भाजपला स्वबळावर सरकार बनविता येणार नाही, अशावेळी इतर पक्षांची मदत भाजपपेक्षा जास्त कॉग्रेसला मिळेल कारण मोंदीच्या नेतृत्वात कुणी जायला तयार होणार नाही.ममता बॅनर्जीसारख्या नेत्याही मोंदीसोबत जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याच बरोबर अटलबिहारी वाजपेयी सुसंस्कृत आणि सर्वसमावेशक नेते होते. मोंदीशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही असं मतही त्यांनी मांडलं.

पवारांचा दावा

1999 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विधानसभा निवडणूक वेगवेगळी लढवली होती. निकालानंतर भाजप-शिवसेना युतीच्या काही नेत्यांनी सरकार स्थापन करण्याची आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर राष्ट्रवादीला दिली होती. पण जातीयवादी पक्षांसोबत जायचे नाही म्हणून आम्ही ही ऑफर नाकारली. त्यावेळी युतीसोबत जाऊन मुख्यमंत्रीपद घेण्याऐवजी काँग्रेससोबत जाऊन आम्ही उपमुख्यमंत्रीपद घेतले. काँग्रेस किंवा भाजपला स्वबळावर सरकार बनवता येणार नाही. अशावेळी इतर पक्षांची जास्त मदत भाजपपेक्षा काँग्रेसला मिळेल कारण मोंदीच्या नेतृत्वात कुणी जायला तयार होणार नाही. ममता बॅनर्जीसारख्या नेत्याही मोंदीसोबत जाणार नाहीत. अटलबिहारी वाजपेयी सुसंस्कृत आणि सर्वसमावेशक नेते होते. मोंदीशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close