मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक नाना आंबोलेंवर गुन्हा दाखल

April 2, 2009 12:41 PM0 commentsViews: 1

2 एप्रिल , मुंबई मुंबईतल्या परेल विभागाचे शिवसेना नगरसेवक नाना आंबोले यांच्याविरोधात भोईवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे लायसन्स इन्स्पेक्टर नितीन काटे यांना मारहाण केल्याप्रकरणी नाना आंबोले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी परेल विभागातील अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यासाठी गेलेल्या नितीन काटे यांना नाना आंबोले यांनी मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच सरकारी कामात हस्तक्षेप करणं, सरकारी कर्मचा-याला मारहाण आणि शिवीगाळ करणं, गोंधळ करणं हे आरोप ठेवून नाना आंबोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close