नाशिकमध्ये तब्बल 3 लाख नावं मतदारयादीतून वगळली

April 22, 2014 4:43 PM2 commentsViews: 2532

1737081022 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसर्‍या टप्प्यात मतदान आता काही तासांवर येऊन ठेपलं आहे. पण पुण्यानंतर आता नाशिकमध्येही मतदारयाद्यांतला घोळ समोर आला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातील यादीतून तब्बल 3 लाख नावं वगळण्यात आली आहेत.

मृत, दुबार आणि बदललेला पत्ता या कारणासाठी ही नाव वगळण्याचं जिल्हा प्रशासनातर्फे कळवण्यात आलंय. मात्र, याबाबत पाठपुराव्या करणार्‍या मतदारांना त्यांचे नाव वगळण्याची कोणतीही माहिती कळवण्यात आलेली नाही.

उलट स्वत:हून जे मतदार याबाबत पाठपुरावा करत आहेत. त्यांनाही निवडणूक निर्णय अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तिसर्‍यासाठी आता परवा अर्थात 24 तारखेला मतदान होत आहे. त्यात तब्बल 3 लाख मतदारांची नावं गायब असल्याची बाब समोर आलीय.

दरम्यान, मतदारांची नावं वगळण्याच्या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी राहिल्या. अनेक ठिकाणी चुकून नावं वगळलं गेल्याची शक्यताही आहे, अशी कबुली राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिली. गेल्या ऑगस्टपर्यंत अपात्र मतदारांची नावं वगळण्याची प्रक्रिया राबवली गेली. पण त्यानंतर मात्र मतदारांच्या नोंदणीकडेच सर्व लक्ष केंद्रीत करण्यात आलं तरी सुद्धा काही पात्र मतदारांची नावं चुकून वगळली गेलीत हे आम्ही मान्य करतो. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर मतदार नोंदणीची मोहीम अधिक व्यापक केली जाईल असंही नितीन गद्रे यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close