‘माझ्या कुटुंबाला अपमानित केलं जातं पण लढा देणार’

April 22, 2014 10:55 PM0 commentsViews: 540

22 एप्रिल : प्रियांका गांधी यांनी रायबरेलीत आज सभा घेतली. या सभेत बोलताना त्या भावुक झाल्या. सध्या प्रचाराची पातळी खालावलीय, माझ्या कुटुंबियांना, माझ्या पतीला प्रचारात अपमानित करण्यात येतंय. विरोधक जेवढं अपमान करतील तेवढं कणखरपणे पुढं येऊ, असं आपण इंदिरा गांधी यांच्याकडून शिकलो आहोत असंही प्रियांका गांधी म्हणाल्या. रायबरेलीत झालेल्या एका प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close