टीव्ही अभिनेत्री मोनाझ मेवावालावर हल्ला करणार्‍या रिक्षाचालकाला अटक

April 23, 2014 10:02 AM0 commentsViews: 1886

monaza23 एप्रिल :  शुटींगकरता जात असलेल्या टीव्ही अभिनेत्री मोनाझ मेवावाला यांच्यावर भररस्त्यात हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्‍या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मोनाझ मेवावाला या आपल्या शुटींगकरता आपल्या कारमधून जात असताना एका रिक्षावाल्यानं त्यांच्याकडे बघून शिवीगाळ केली आणि आक्षेपार्ह वर्तन केलं. त्याला मोनाझ यांनी आक्षेप घेतल्यानंतर रिक्षावाल्यानं त्यांचा पाठलाग करुन त्यांच्या कारची मोडताड केली. त्यात मोनाझ यांच्या गाडीचं नुकसान झालं.

या वेळी मोनाझ यांनी प्रसंगावधान दाखवून या हल्ल्याचं व्हिडीओ शुटींंग केलं. मात्र या वेळी रस्त्यांतील लोकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. ठाण्यातील मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी या प्रकरणाची माहिती झाल्यावर त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या कानावर हे प्रकरण घातलं. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या रिक्षावाल्याला अटक केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close