रामदास कदम यांच्या विरोधात FIR दाखल

April 23, 2014 1:49 PM2 commentsViews: 3448

ramdas-kadam_news23 एप्रिल : मुंबईतील नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये प्रक्षोभक वक्तव्य करणे शिवसेना नेते रामदास कदम यांना चांगलेच भोवले आहे. सहायक निवडणूक अधिकार्‍यांनी कदम यांच्याविरोधात वांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस स्टेशनमध्ये FIR  दाखल केला आहे. प्रक्षोभक विधान करुन सामाजिक तेढ निर्माण केल्याचा ठपका कदम यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मुंबईत सोमवारी नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभा घेतली होती. या प्रचार सभेत भाषण करताना रामदास कदम यांनी मुस्लीमांवर जोरदार टीका केली होती.  सहा महिन्यांच्या आत मोदी पाकिस्तान नष्ट करतील, असे प्रक्षोभक विधान कदम यांनी केले होते. याची दखल घेत निवडणूक अधिकार्‍यांनी कदम यांच्याविरोधात FIR दाखल केला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींचं नेतृत्व ज्यांना मान्य नसेल त्यांनी पाकिस्तानात निघून जावे, अशी धमकी देणारे भाजपचे नवादाचे उमेदवार गिरीराज सिंह अडचणीत सापडले आहेत. बिहारमधल्या बोकारो कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे. त्यांच्याविरोधात आधीच FIR दाखल करण्यात आला आहे. मोदींनी त्यानंतर काल ट्विट करून प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍यांविरोधात नाराजी व्यक्त केली होती.

 

  • chandrakant

    bhai kahi honar nahi sala aapala sarkarch nalayak aahe

  • sunil

    ibn 7 fakat mulim lokan badal bolta ,,hindu badal koni nahi bolat,,,haydrabad made to
    Akbar Owaisi Exposes very darty statement

close