अरविंद केजरीवाल थोड्याच वेळात भरणार वाराणसीतून उमेदवारी अर्ज

April 23, 2014 1:01 AM0 commentsViews: 280
kejriwal23 एप्रिल : आम आदमी पार्टीचे उमेदवार अरविंद केजरीवाल थोड्या वेळात वाराणसीतून आपला अर्ज भरणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी रोड शो करून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
या रोड शोसाठी चांगलीच गर्दी झाली होती. यावेळी भाषण करताना केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी उद्या वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोदींनी जाहिरातींवर 5000 कोटी रुपये खर्च केल्याचा त्यांनी आरोप केला. तर राहुल गांधी हे अमेठीच्या जनतेशी संवाद साधत नाहीत. त्यांना भेटत नाहीत. असे खासदार काय कामाचे, अशी टीका केली.
वाराणसीत निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 12 मे रोजी मतदान होणार आहे. देशातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या या मतदारसंघातील लढतीत केजरीवाल भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवीत आहेत. मोदी उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसने याठिकाणाहून अजय राय यांना उमेदवारी दिली आहे.
close