केजरीवालांनी वाराणसीतून भरला उमेदवारी अर्ज

April 23, 2014 3:16 PM0 commentsViews: 1096

kejriwal roadshow23 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज (बुधवारी) वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्याबरोबर मनीष सिसोदिया आणि पक्षाचे अनेक कार्यकर्ते होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी केजरीवाल यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

केजरीवाल यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह रोड शो काढला. दुपारी दोनच्या वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले. या रोड शोसाठी चांगलीच गर्दी झाली होती. यावेळी भाषण करताना केजरीवाल यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

मोदींनी जाहिरातींवर 5,000 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. तर राहुल गांधी हे अमेठीच्या जनतेशी संवाद साधत नाहीत त्यांना भेटत नाहीत असे खासदार काय कामाचे ? अशी टीकाही केजरीवाल यांनी केली. तर नरेंद्र मोदी उद्या वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close