आज अवघ्या जगाचं लक्ष ‘जी- ट्वेंन्टी’

April 2, 2009 2:17 PM0 commentsViews: 3

2 एप्रिल सध्याअवघ्या जगाचं लक्ष जी- ट्वेंन्टी परिषदेकडे लागून राहिलंय. लंडनमध्ये जी-ट्वेंटी परिषदेला आज सुरूवात झालीय. पंतप्रधान मनमोहन सिंग तिथो भारताच्या वतीने उपस्थित आहेत. ते आज रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. जागतिक आर्थिक मंदी आणि दहशतवाद हे प्रमुख विषय यावेळी 'जी-ट्वेंटी' परिषदेच्या अजेंड्यावर आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग, ब्रिटनचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांच्याशीही चर्चा केली. भारताने या परिषदेच्या निमित्ताने जागतिक मंदीमुळे उद्भवलेल्या संकटाच्या वेळी कातडीबचाऊ धोरण स्वीकारणार्‍या श्रीमंत देशांवर टीका केलीय. युरोपियन देशांनी फायनान्शिअल मार्केटसाठी नियम बदलण्याची भूमिका पुढे केलीय तर अमेरिकेने मात्र बँकांना जीवदान मिळण्याची गरज व्यक्त केलीय.

close