सोमनाथ भारतींना भाजप कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण

April 23, 2014 9:31 PM0 commentsViews: 2849

somnath_bharti23 एप्रिल : वाराणसीमध्ये आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. भाजप समर्थकांनी त्यांना बेदम मारहाण केलीय. वाराणसीतल्या असी घाट भागात एका खाजगी न्यूज चॅनलसाठी कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात हा सर्व प्रकार घडलाय.

भारती यांच्या कारवरही दगडफेक आणि तोडफोड करण्यात आलीय. त्यांच्या ड्रायव्हरलाही मारहाण करण्यात आलीय. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झालीय. पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या व्यक्तीच्या समर्थकांकडून अशा प्रकारच्या कृतीची अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया आपचे प्रवक्ते आतिशी मार्लेना यांनी दिलीय.

तर भाजपनंही या हल्ल्याचा निषेध करत असल्याचं म्हटलंय. दरम्यान, आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विजय आपलाच होईल आणि वाराणसीची जनता आपल्यासोबत आहे, असा दावा केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close