उमेदवारांची नाष्टा पार्टी

April 23, 2014 9:46 PM0 commentsViews: 2115

23 एप्रिल : निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे असलेले उमेदवार सहसा एकत्र येणं आणि तेही गप्पा मारण्यासाठी. हे खूपच दुर्मिळ. पण पुण्यातील उमेदवार मात्र त्याला अपवाद ठरले. प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार एकत्र आले कोणत्याही वादविवादासाठी नाही. तर चक्क एकत्र गप्पा मारायला. पुण्यातल्या वाडेश्वर हॉटेलमध्ये इडली, डोसावर ताव मारत आणि चहा कॉफीचा आस्वाद घेत भाजपचे अनिल शिरोळे, काँग्रेसचे विश्वजीत कदम आणि आपचे उमेदवार सुभाष वारे यांनी आज एकत्र न्याहरी केली. त्यांना एकत्र आणलं अंकुश काकडे, गोपाळ चिंतल आणि श्रीकांत शिरोळे या राजकीय कार्यकर्त्यांनी. पण मनसेचे दीपक पायगुडे मात्र याला उपस्थित राहिले नाहीत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close