मोदींच्या प्रचारासाठी परदेशातून पैसा ? -मुख्यमंत्री

April 24, 2014 8:26 AM0 commentsViews: 1747

24 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी उद्योजकांकडून आणि परदेशातून पैसा पुरवला गेला का ? असा सवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारलाय. मोदींनी आपल्या प्रचारासाठी जवळपास 10 हजार कोटींचा खर्च केलाय. आजपर्यंत कुणीही आपल्या प्रचारासाठी इतका खर्च केला नाही. मोदींकडे इतका पैसा कुठून आलाय ? मोदींकडे तर पैशाचा छापखाना तर नाहीये. त्यांना काही उद्योजक पाठीशी घालत आहेत असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. राज्यातला निवडणुकांचा शेवटचा टप्पा पार पडण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी, मनसे आम आदमी पार्टी, तिसरी आघाडी या सर्व विषयांवर मनमोकळी उत्तरं दिली. विरोधकांच्या तुलनेत आम्ही कमी पडलो. आम्ही काही गोष्टींमध्ये कमी पडलो अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close