भाजपच्या जाहिरनाम्यात रामनामाचा जप

April 3, 2009 8:22 AM0 commentsViews: 10

3 एप्रिलमागे पडत चाललेला हिंदुत्त्वाचा मुद्दा भाजपने पुन्हा एकदा अजेंड्यावर आणलाय. भारतीय जनता पार्टीने आज रामनवमीचा मुहूर्त साधून आपला निवडणूक जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने आम आदमीसाठी निवडणूक जाहिरनामा प्रसिद्ध करून प्रचारात आघाडी घेतल्यानंतर आता भाजप सामान्यांना सत्तेत आल्यास काय आश्वासन देतील याबाबतची उत्सुकता संपून आता खरं चित्र जनतेसमोर आलंय. भाजपच्या अजेंड्यावर पुन्हा एकदा राममंदिर आणि रामसेतूचा मुद्दा पुढे आलाय. 11 वर्षानंतर भाजपनं हा मुद्दा जनतेसमोर आणलाय. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नावाखाली जे वादग्रस्त मुद्दे भाजपने सोडून दिले ते पुन्हा भाजपनं अजेंड्यावर आणलेत. त्यात 370 कलम रद्द करणार असं आश्वासन देण्यात आलंय. दहशतवादाला आळा घालण्यासाठी पोटासारखा कायदा पुन्हा आणण्याची घोषणा भाजपने केलीय. रामासोबतच इतर समाजघटकांना खुष करण्याचा प्रयत्न भाजपनं केलाय. तीन लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांना इन्कमटॅक्स न लावण्याची घोषणाही भाजपनं केलीय. महिलांसाठी ही मर्यादा साडेतीन लाख रुपये इतकी करण्यात आलीय. काँग्रेसनं तीन रुपये किलो दरानं महिन्याला 25 किलो तांदूळ आणि गहू गरीबांना देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याला उत्तर देण्यासाठी दोन रुपये किलो दरानं गरीबांना गहू देण्याचं आश्वासन भाजपनं दिलंय. शेतकर्‍यांचं सगळ कर्ज माफ करण्याचंही आश्वासन यात देण्यात आलंय. तर शेतकर्‍यांना 4 टक्के दरानं कर्ज देणार असल्याचं भाजपनं सांगितलंय. गरीब मुलींना शाळेत जाण्यासाठी फुकट सायकली देण्याचंही आश्वासन भाजपनं दिलंय. पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देणार असल्याचंही यात म्हटलंय. दिल्लीत हा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून यावेळी पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. मात्र या आश्वासनांची पूर्ती नेमकी कशी आणि कधी होणार याचा आँखोदेखा हाल प्रत्यक्ष निवडणुकीनंतरच पाहयला मिळेल. पुन्हा एकदा राम मंदिर, राम सेतू2 रुपये किलो तांदूळ आणि गहू शेतकर्‍यांना 4 टक्के दरानं कर्जभूकमुक्त भारताचं आश्वासन विकासाच्या मुद्द्यांनाच प्राधान्य.

close