वरूण यांना भेटण्याची मनेका गांधीना मनाई

April 3, 2009 8:55 AM0 commentsViews: 5

3 एप्रिल, इटा वरूण गांधी यांना जेलमध्ये भेटायला गेलेल्या त्यांच्या आई मनेका गांधी यांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे वरूण गांधी यांचे समर्थक प्रचंड प्रमाणात चिडले आहेत. जेलच्या नियमांप्रमाणे आरोपीचे नातेवाईक आरोपीला आठवड्यातून तीनवेळाच भेटू शकतात. पण वरूण यांच्यासाठीचा हा कोटा संपला असल्याचं इटा जिल्हा मॅजिस्ट्रेटनी सांगितलं आहे. पण मायावती सरकार मुद्दाम अशी वागणूक देत असल्याचा वरुण गांधी समर्थकांनी आरोप केला आहे. वरूणला रासुका लावल्याविरोधात या समर्थकांनी एसएमएस कॅम्पेनही सुरू केलं आहे.

close