ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मॅग्रा आयपीएल खेळायला उत्सुक

April 3, 2009 9:26 AM0 commentsViews: 5

3 एप्रिल ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ग्लेन मॅग्रा एका वर्षाच्या विश्रांतीनंतर क्रिकेटच्या दुनियेत परतत आहे. मॅग्रा आयपीएल खेळायला उत्सुक आहे. मॅग्रा दिल्ली डेअरडेव्हील्स टीमचा खेळाडू असून तो दिल्लीत दोन दिवस सराव करणार आहे. मागचं वर्षं त्याच्या कुटुंबासाठी दु:खद होतं. त्याची पत्नी जेनचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. पण मॅग्रा आता या दु:खातून सावरला आहे. दिल्ली डेअर डेव्हिल्स बरोबर मॅग्रा करारबद्ध आहे. आणि टीमबरोबर सराव करण्यासाठी थोड्याच दिवसात तो दिल्लीला येणार आहे. आपल्या पत्नीच्या नावाने मॅग्राने एक फाऊंडेशन सुरू केलंय. फाऊंडेशनच्या वतीने कॅन्सर रुग्णांना मदत करण्यात मॅग्रा हल्ली बराचसा वेळ घालवतो. पण आता पुढचे दोन महिने हे काम बाजूला ठेवून आयपीएलच्या दुसर्‍या हंगामाची तयारी मॅग्राने सुरू केली आहे.

close