वाराणसी मोदीमय, मोदींनी भरला अर्ज !

April 24, 2014 3:51 PM0 commentsViews: 4099

235modi_varansi24 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरला. त्यापूर्वी त्यांनी वाराणसीमधून भव्य असा रोड शो करून शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी रस्त्यावरचं वातावरण अक्षरशः मोदीमय झालं होतं.

सर्व बाजूंनी भाजप आणि मोदी समर्थकांची एकच गर्दी केली होती. अर्ज भरल्यानंतर मोदींनी वाराणसी ही जगाची आध्यात्मिक राजधानी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. या अगोदर मोदींनी गुजरातमध्ये बडोद्यातून उमेदवारी अर्ज भरला आहे.

वाराणसीमध्ये मोदींना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम आदमीचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर भाजपने सेफ गेम म्हणून मोदींना बडोद्यातूनही उमेदवारी जाहीर केली. एक दिवस बुधवारीच केजरीवाल यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला. त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत मोदींनीही भव्य रॅली काढून आपला अर्ज दाखल केला. त्यामुळे वाराणसीच्या राजकारणात आता आणखी रंग भरले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close