आंधळेवाडीत फेरमतदानाला उतस्फुर्त प्रतिसाद

April 24, 2014 9:13 PM0 commentsViews: 2912

230525-haha24 एप्रिल : बीड जिल्ह्यातल्या आंधळेवाडी या गावात फेरमतदान सुरू आहे. आंधळेवाडी इथे सांध्याकाळी 6 वाजेपर्यंत 85.96 टक्के मतदान मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.

17 तारखेला आंधळेवाडी इथे एका मतदान केंद्रावर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता आणि मतदान केंद्रचा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. या गोंधळात ईव्हीएम मशीनची बटणं दाबली गेली होती. प्रत्यक्ष 392 लोकसंख्ये असलेल्या या गावाच 8 मतं जात नोंदवली गेली होती. त्याची नोंद घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाकडे फेरनिवडणुकीची मागणी केली होती. म्हणून मग निवडणूक आयोगानी फेरमतदानाचे आदेश दिले होते. त्यानंतर आज इथे फेरमतदान घेण्यात आलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close