रामनवमी राज्यभर जल्लोषात साजरी

April 3, 2009 9:59 AM0 commentsViews: 2

3 एप्रिलआज रामनवमीचा सण. राज्यात शिर्डी, नाशिक, नागपूर अशा अनेक ठिकाणी राम मंदिरात हा सण उत्साहात साजरा होत आहे. सणावारी राज्यभरातील भाविकांची पाऊलं रामदर्शनासाठी राम मंदिराकडे वळत आहेत. शिर्डीच्या राम मंदिरात काल पासूनच भक्तांची अलोट गर्दी जमली आहे. काल संध्याकाळपासून इथे राज्यभरातून भक्तगणांच्या पालख्या दाखल झाल्या आहेत. नाशिकमध्ये तर पेश्वेकालीन काळाराम मंदिरात आज सकाळपासूनच रामभक्तांनी गर्दी केली होती. पहाटे सर्वप्रथम मंदिरात विधीवत रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. दिवसभर राम दर्शनास भविकंाची रांग लागून आहे. एवढंच नव्हे तर रामजन्मोत्सवानिमित्तानं या ठिकाणी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. नागपूरमध्ये तर पोद्दारेश्वर मंदिरात रामनवमीच्या उत्सवाची धामधूम सुरू आहे. पोद्दारेश्वर मंदिरातल्या पुरातन संगमरवरी राम, लक्ष्मण, सीतेला दागिने आणि रेशमी वस्त्रांनी अलंकारित करण्यात आलं आहे. दिवसभरात दर्शन घेण्यास आलेले भक्त खरी वाट पाहतात ती संध्याकाळी मोठ्या जल्लोषात निघणार्‍या शोभयात्रेची. अशा रितीने रामजन्मापासून थाटामाटात सुरू झालेल्या रामनवमीच्या या सणाला राज्याच्या प्रत्येक भागातून रामभक्तांच्या आनंदाला उधाण आलं आहे.

close